SBI चं कर्ज झालं स्वस्त, पण ठेवींवरील दरही घटले

एसबीआयचं गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे. कर्ज स्वस्ताईची भेट देतानाच एसबीआयने आपल्या ठेवींवरील व्याजदरातही कपात केली आहे.

SHARE

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय-SBI) ने आपल्या कर्जावरील व्याजदरात ( MCLR) ०.१० टक्के कपात केली आहे. त्यामुळे एसबीआयचं गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे. नवीन दर  १० आॅक्टोबरपासून लागू होतील. कर्ज स्वस्ताईची भेट देतानाच एसबीआयने आपल्या ठेवींवरील व्याजदरातही कपात केली आहे. 

एसबीआयने १ लाख रुपयांपर्यंतच्या बचत ठेवींवरील व्याजदर ३.५ टक्क्यांवरून कमी करून ३.२५ टक्के केला आहे. हे नवीन दर १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. याचबरोबर बँकेने रिटेल टर्म डिपॉझिट आणि बल्क टर्म डिपॉझिटवरील व्याजदर ०.१० ते ०.३० टक्क्याने कमी केले आहेत. १ वर्ष ते २ वर्ष मुदतीच्या ठेवींवर ही कपात लागू असेल. नवीन दर १० आॅक्टोबरपासून लागू होतील. 

एसबीआयने २०१९ -२० या आर्थिक वर्षात सलग सहाव्यांदा कर्जावरील व्याजदर घटवले आहेत. आता १ वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर ८.१५ टक्क्यावरून ८.०५ टक्के झाला आहे. २ वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर ८.२५ टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांवर आला आहे. तर ३ वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर ८.२५ टक्के झाला आहे. व्याजदर कपातीनंतर एसबीआयचा शेअर्स २.३ टक्क्याने वधारला. एसबीआय देशात सर्वाधिक स्वस्तात गृह कर्ज देत आहे. हेही वाचा -

SBI च्या डेबिट कार्डावर मिळणार EMI चे पर्याय
संबंधित विषय
ताज्या बातम्या