SBI च्या डेबिट कार्डावर मिळणार EMI चे पर्याय


SHARE

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने  दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना खास भेट दिली आहे.  एसबीआयने ग्राहकांसाठी डेबिट कार्डवर ईएमआईचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामुळे खरेदी करणं ग्राहकांसाठी आणखी सोयीस्कर होणार आहे.

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ग्राहकांच्या सोईसाठी बँकेने १ ऑक्टोबरपासून अनेक सकारात्मक बदल केले आहेत. या ईएमआयच्या सेवेचासुद्धा समावेश आहे. केवळ ६ स्टेपच्या माध्यामातून या सेवेचा फायदा ग्राहक फायदा घेवू शकतात. या सेवेअंतर्गत कुठल्याही कागदपत्रांशिवाय ग्राहकांना ६ ते १८ महिन्यांपर्यंत ईएमआयचा पर्याय उपलब्ध होईल. 

सोबतच सेवा शुल्काव्यतिरिक्त मासिक सरासरी शिल्लक (एमएबी) न राखल्याबद्दल होणाऱ्या दंडाची मर्यादा देखील कमी करण्यात आली आहे. याआधी मेट्रो सिटी आणि शहरी भागातील खातेधारकांसाठी मासिक शिल्लक अनुक्रमे ५ हजार आणि ३ हजार रूपये असणं बंधनकारक होतं. परंतु त्यात बदल करत १ ऑक्टोबरपासून दोन्ही खात्यात किमान ३ हजार रूपयेच ठेवावे लागणार आहेत. 

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी NEFT आणि RTGS व्यवहारदेखील स्वस्त करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. हेही वाचा-

PMC बँक घोटाळा: निलंबीत व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक

फ्लिपकार्ट, अॅमेझाॅनची बंपर आॅफर, दिवाळी सेल 'या' तारखेपासून सुरूसंबंधित विषय
ताज्या बातम्या