Advertisement

प्लिपकार्ट, अॅमेझाॅनची बंपर आॅफर, दिवाळी सेल 'या' तारखेपासून सुरू

फ्लिपकार्टने बिग दिवाली सेलची तर तर अॅमेझाॅनने ग्रेट इंडियन फेस्टिवल-सेलिब्रेशन स्पेशलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅमेरा, टीव्ही या वस्तूंवर मोठी सवलत मिळणार आहे.

प्लिपकार्ट, अॅमेझाॅनची बंपर आॅफर, दिवाळी सेल 'या' तारखेपासून सुरू
SHARES

फ्लिपकार्ट आणि अॅमेझाॅन या आॅनलाइन शाॅपिंग वेबसाइटने आॅफर्सचा धडाकाच लावला आहे. दोन्ही कंपन्यांचा सेल नुकताच संपला असून आता पुन्हा एकदा त्यांनी सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टने बिग दिवाली सेलची तर तर अॅमेझाॅनने ग्रेट इंडियन फेस्टिवल-सेलिब्रेशन स्पेशलची घोषणा केली आहे.  या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅमेरा, टीव्ही या वस्तूंवर मोठी सवलत मिळणार आहे. 

फ्लिपकार्टचा सेल १२ ते १६ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.  मात्र, प्लिपकार्ट प्लस मेंबरसाठी हा सेल लवकर म्हणजे ११ आॅक्टोबरपासून रात्री ४ तास आधी ८ वाजता सुरू होणार आहे. अन्य युजर्ससाठी हा सेल १२ आॅक्टोबरला रात्री १२ वाजता सुरू होणार आहे. अॅमेझाॅनचा सेल १३ आॅक्टोबरपासून रात्री १२ वाजता सुरू होणार १७ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

फ्लिपकार्टच्या बिग दिवाली सेलमध्ये टीव्ही आणि घरगुती उपकरणांवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. या सेलमध्ये ५० हजारपेक्षा अधिक उत्पादने उपलब्ध असतील. सेलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे.  तर ग्राहकांना नो कॉस्ट EMI, एक्स्चेंज ऑफरसह डिस्काउंटवर मोबाइल प्रोटेक्शन प्लान आदी सुविधाही मिळणार आहेत. रेड मी नोट ७, रेड मी नोट ७ एस, रिअल मी ५, विवो Z1 प्रो आणि रिअलमी सी २ सह अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सवलत मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना बाय बॅक गॅरंटीही मिळणार आहे. हेडफोन्स, स्पीकर, लॅपटॉप, कॅमेरा, स्मार्टवॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ९० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स विभागात अनेक वस्तूंवर सुमारे ९० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. यात हेडफोन्स, स्पीकर, लॅपटॉप आणि कॅमेऱ्याव्यतिरिक्त स्मार्टवॉच सारख्या वस्तूंचा समावेश आले. 

अॅमेझाॅनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल-सेलिब्रेशन स्पेशल सेल प्राईम सभासदांसाठी १२ आॅक्टोबरला रात्री १२ वाजता सुरू होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. याशिवाय एक्सचेंज आॅफर आणि नो काॅस्ट ईएमआय आदी आॅफर्सही असतील. तर घरगुती उपकरणांवर ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. हेही वाचा -

PMC बँक घोटाळा: निलंबीत व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक
संबंधित विषय
Advertisement