Advertisement

PMC बँक घोटाळा: निलंबीत व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक


PMC बँक घोटाळा: निलंबीत व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक
SHARES

'पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँके'च्या (पीएमसी) कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे(EOW)ने शुक्रवारी पीएमसी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक केली. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील ही तिसरी अटक आहे.  

याआधी पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणारे एचडीआयएल कंपनीचे प्रर्वतक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं परंतु तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची जवळपास ३ हजार ५०० कोटींची संपत्तीही पोलिसांनी जप्त केली आहे.

पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण ४४ मोठ्या खात्यांपैकी १० खाती ही एचडीआयएल आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. RBI च्या आदेशावरुन सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएल आणि बँकेच्या १० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूकही करण्यात आली आहे.  

२७ सप्टेंबर रोजी पीएमसी बँकेचे माजी व्यवस्थापकिय संचालक जॉय थॉमस यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही कोणतीही चूक केलेली नाही, कोणताही घोटाळा केलेला नाही असा दावा केला होता.

संबंधित विषय
Advertisement