Advertisement

मुंबईत 24 तास कमर्शियल हब सुरू ठेवण्याची मागणी

समाजवादी पक्षाचा प्रस्ताव

मुंबईत 24 तास कमर्शियल हब सुरू ठेवण्याची मागणी
SHARES

समाजवादी पक्षाच्या मुंबईतील नगरसेवकांनी लोअर परळ, बीकेसी (BKC) आणि दक्षिण मुंबईतील काही भागांसारख्या प्रमुख ठिकाणी 24 तास कमर्शियल हब सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

महापौर आणि महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी या व्यावसायिक भागांत अधिकृतपणे रात्रंदिवस कामकाजास परवानगी देण्यासाठी पायलट प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मुंबईला ‘कधीही न झोपणारे शहर’ म्हणून ओळखले जात असले तरी अनेक व्यावसायिक क्षेत्रे औपचारिकरीत्या रात्रभर खुली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

योग्य सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, ध्वनी नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि परवाना नियम यांसारख्या मार्गदर्शक तत्त्वांसह नियमनबद्ध 24/7 मॉडेल लागू केल्यास पर्यटन, हॉटेल व्यवसाय, लघुउद्योग आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल. रोजगारनिर्मिती होईल आणि महापालिकेचा महसूल वाढेल, असे नगरसेवकांचे मत आहे.

तसेच जगातील अनेक आंतरराष्ट्रीय शहरांनी अशा ‘नाईट-टाईम इकॉनॉमी’ मॉडेल यशस्वीरित्या स्वीकारल्याचेही त्यांनी नमूद केले.



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा