Advertisement

उच्च न्यायालयाकडून FDAला 5 लाखांचा दंड

98% स्वच्छतेचं प्रमाणपत्र असूनही कारवाई

उच्च न्यायालयाकडून FDAला 5 लाखांचा दंड
SHARES

पुण्यातील मिठाई विक्रेत्याचं दुकान 98 टक्के स्वच्छता नियमांचं पालन करत असल्याचं अहवालात स्पष्ट झालंय पण तरीही दुकान सुरू करू न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र FDAला मोठा दणका दिला आहे.

न्यायालयाने पुण्यातील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्सला 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश FDAला दिले आहेत. तसेच दुकानाचा परवाना निलंबित करण्याचा FDAचा निर्णय रद्द करून दुकान पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

या दुकानावर 12 जून रोजी खाद्यविषबाधेच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली होती आणि त्याचा परवाना निलंबित करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या पुनर्तपासणीत दुकानाने 98 टक्के नियमांचे पालन केल्याचं समोर आलं. तरीही परवाना निलंबित ठेवण्यात आला.

दुकान तब्बल 34 दिवस बंद राहिलं. त्यामुळे व्यवसायाचं अंदाजे 8.74 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला.

या प्रकरणात उच्च न्यायालयाने FDAच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “98 टक्के नियमांचं पालन झाल्यानंतरही अपील करायला सांगणं म्हणजे नागरिकांना त्रास देणं,” अशा शब्दांत न्यायालयाने FDAला सुनावलं. FDAने अन्नसुरक्षेसाठी तपासणी करणं योग्य असल्याचं मान्य करताना, मात्र या प्रकरणात विभाग “overboard” गेल्याचं न्यायालयाने म्हटलं.

FDAच्या कारवाईवरच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत 5 लाखांची नुकसानभरपाई ठोठावल्याने हे प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे.



हेही वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर पदव्युत्तर डिप्लोमा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा