Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर पदव्युत्तर डिप्लोमा

प्रवेशासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर पदव्युत्तर डिप्लोमा
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि विचारधारेचा सखोल अभ्यास करण्याची संधी आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे.


नवी मुंबई महापालिका आणि मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एक वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2026 आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार म्हणजेच NEPच्या अंतर्गत हा अभ्यासक्रम दोन सेमिस्टरमध्ये विभागण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारी वर्ग घेतले जाणार असून, अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून उपलब्ध आहे.

कोणाला प्रवेश घेता येणार?

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. प्रवेशासाठी वयोमर्यादा नाही.

अभ्यासक्रमाचे वर्ग ऐरोली सेक्टर 15 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि सांताक्रूझ पूर्व येथील जे. पी. नाईक भवन, कालिना येथे होणार आहेत.

अभ्यासक्रमात काय शिकवले जाणार?

पहिल्या सेमिस्टरमध्ये सामाजिक न्याय, डॉ. आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विचार, समकालीन प्रश्न आणि आंबेडकरांचे विचार, ‘Annihilation of Caste’, आर्थिक विचार आणि संशोधन पद्धती यांचा अभ्यास केला जाणार आहे.

तर दुसऱ्या सेमिस्टरमध्ये याच विषयांचा पुढील भाग, त्यासोबत ‘Buddha and His Dhamma’, ऑन-जॉब ट्रेनिंग किंवा फील्डवर्क यांचा समावेश आहे.

या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक प्रा. वाल्मीक के. सरवदे यांच्या देखरेखीखाली होणार आहे. अभ्यासक्रमाचे मूल्यमापन मुंबई विद्यापीठ करणार असून यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

इच्छुक विद्यार्थ्यांना MU Samarth पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या 9372734247 / 7350408686 या क्रमांकांवर किंवा NMMC समाजसेवक दशरथ गामभिरे यांच्याशी 9702309054 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख — 20 ऑगस्ट 2026.



हेही वाचा

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा