
तारापूर (tarapur) औद्योगिक वसाहतीमधील विराज प्रोफाइल एसएमएस या पोलाद निर्मिती कारखान्यात 17 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी सुमारे 11.45 वाजता भट्टीमध्ये पोलाद वितळविण्याची प्रक्रिया सुरू असताना भीषण स्फोट झाला.
स्फोटाची (blast) तीव्रता इतकी मोठी होती की, कारखान्याचे पत्रे दूरवर उडाले आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. दरम्यान, दुर्घटनेच्या कारणांची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
माहितीनुसार, या घटनेत धर्मेंद्र कुमार रामअवध शर्मा (45) हे क्रेन चालक भाजले आहेत. त्यांना तातडीने बोईसर येथील स्टार लाईट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची माहितीही प्रशासनाकडून घेतली जात आहे.
स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की विराज प्रोफाइल कारखान्यासह आजूबाजूचा परिसर हादरल्याने कामगारांनी घाबरून बाहेर रस्त्यावर पळ काढला. कारखान्याचे पत्रे दूरवर फेकले गेले, शेजारील कारखान्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या.
स्फोटाच्या दोन मिनिटे अगोदर धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजल्याने घटनास्थळी उपस्थित सर्व कामगारांनी बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटनेपूर्वी धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजला होता. त्यामुळे कारखान्यातील कामगारांना संभाव्य धोका लक्षात आला आणि त्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. या वेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
भट्टीच्या प्रक्रियेदरम्यान नेमकी कोणती तांत्रिक अडचण निर्माण झाली, सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का आणि दुर्घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास केला जात आहे.
हेही वाचा
