
आग वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
इमारतीत अडकलेल्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाकडून बचावकार्य करण्यात आलं. तळघरात अडकलेल्या दोन कामगारांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे.
सुरुवातीला आगीला लेव्हल-1 म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, इमारतीत महत्त्वाच्या आयकर विभागाच्या फाइल्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये असल्याने आग आणखी पसरू नये आणि मोठं नुकसान टाळता यावं यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
हेही वाचा
