पालघर लैंगिक अत्याचार प्रकरण: काकाकडून 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप

पालघर प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप; डिजीपींकडे कुटुंबीयांची धाव

पालघर लैंगिक अत्याचार प्रकरण: काकाकडून 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप
SHARES

पालघरमधील एका कॉन्व्हेंट शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर तिच्या 50 वर्षीय काकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वारंवार प्रयत्न करूनही पालघर पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला नाही आणि उलट कुटुंबालाच धमकावले, असा आरोप पीडितेच्या पालकांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 जुलैच्या रात्री 10:20 च्या सुमारास घडली. घराच्या तळमजल्यावर कौटुंबिक वाद सुरू असताना, वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आणि व्यवसायाने सराफ (ज्वेलर) असलेल्या काकाने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे.

पीडितेचे वडील, जे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांनी सांगितले की या घटनेनंतर मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यात होती. तिने शाळेत जाणे बंद केले, ती घरातच एकटी राहू लागली, तिला वारंवार ताप येऊ लागला, तिची भूक मंदावली आणि तिने शाळेच्या परीक्षाही दिल्या नाहीत.

तिच्या वागणुकीतील हा मोठा बदल पाहून, 4 ऑगस्ट रोजी पहाटे 6च्या सुमारास आईने तिला प्रेमाने विचारणा केली. अखेरीस रडत-रडत त्या मुलीने आपल्यावरील या भयानक अत्याचाराची माहिती आईला दिली.

अत्याचाराची माहिती मिळताच, कुटुंबाने 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस' (POCSO) कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यासाठी तातडीने पालघर पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर ऑनलाइन तक्रार करण्यासाठी कुटुंबाला आपत्कालीन मदत क्रमांकावर (११२) संपर्क साधणे भाग पडले.

तसेच, 4 ऑगस्ट रोजी वैद्यकीय तपासणीसाठी पीडितेला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी पोलिसांना अधिकृत वैद्यकीय अहवाल (मेमो) दिला.

5 ऑगस्ट रोजी जेव्हा ते वैद्यकीय अहवालासह पुन्हा पालघर पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा पोलिसांनी त्या मानसिक धक्क्यात असलेल्या 10 वर्षीय मुलीची भीतीदायक पद्धतीने चौकशी केली. जर त्यांनी हा खटला पुढे चालवला, तर पीडितेच्या वडिलांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जाईल, अशी उघड धमकी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली, असा आरोप आईने केला आहे. 

न्यायासाठी हतबल झालेल्या पीडितेच्या कुटुंबाने महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे (DGP) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोपी काकांविरुद्ध तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करण्याची व सखोल चौकशीची मागणी केली आहे.

तसेच, निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्यासाठी हा तपास पालघर पोलीस ठाण्याकडून अन्यत्र वर्ग करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या आरोपांना प्रतिसाद देताना पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल.

दरम्यान, या आरोपांवर पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना, प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. 



हेही वाचा

चर्चगेटमध्ये आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा