Advertisement

बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?

बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद झाल्यास काही कर्मचाऱ्यांना इतर सरकारी कंपन्यांमध्ये सामावून घेतलं जाईल. तर काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल. दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या १ लाख ६५ हजार कर्मचारी आहेत.

बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?
SHARES

आर्थिक गर्तेत अडकलेल्या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपन्या बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल MTNL) ला आता अखेरची घरघर लागली आहे. या दोन्ही कंपन्यांना कधीही टाळं लागू शकतं. बीएसएनल आणि एमटीएनएलला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागाने अर्थ मंत्रालयाला मदत मागितली होती. मात्र अर्थ मंत्रालयाने ही मदत नाकारली आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्या बंद होण्याची शक्यता आहे. 

मागील काही वर्षांपासून बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल MTNL) आर्थिक अडचणीत आहेत. या कंपन्या पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडे ७४ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मदतीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला आहे. त्यामुळे या कंपन्या आता बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचं समोर येत आहे. दोन्ही कंपन्यांवर ९५ हजार कोटींचा भार आहे. 

बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद झाल्यास काही कर्मचाऱ्यांना इतर सरकारी कंपन्यांमध्ये सामावून घेतलं जाईल. तर काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल. दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या १ लाख ६५ हजार कर्मचारी आहेत. 

हेही वाचा -

SBI चं कर्ज झालं स्वस्त, पण ठेवींवरील दरही घटले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा