Advertisement

एअर इंडियाच्या सॅन फ्रान्सिस्को-मुंबई विमानात झुरळ

या घटनेचे कारण समजून घेण्यासाठी चौकशी केली जाईल असे एअरलाइनने म्हटले आहे.

एअर इंडियाच्या सॅन फ्रान्सिस्को-मुंबई विमानात झुरळ
SHARES

सॅन फ्रान्सिस्को ते मुंबई (mumbai) या विमानात प्रवाशांना झुरळे दिसल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. सोमवारी पहाटे कोलकाता विमानतळावर (airport) नियोजित थांब्यादरम्यान विमानाची (air india) साफसफाई करण्यात आली.

एअरलाइनने आपल्या बचावात म्हटले आहे की, या घटनेचे कारण समजून घेण्यासाठी चौकशी करण्यात येईल. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24.com वर उपलब्ध माहितीनुसार, हे विमान बोईंग 777 होते. एअरलाइनने प्रवाशांना झालेल्या प्रकाराबद्दल माफी देखील मागितली.

“सॅन फ्रान्सिस्को (san francisco) ते मुंबई व्हाया कोलकाता (kolkata) या विमानात दुर्दैवाने दोन प्रवाशांना काही लहान झुरळे (cockroaches) असल्याचे आढळून आले. म्हणून आमच्या केबिन क्रूने दोन्ही प्रवाशांना त्याच केबिनमधील इतर जागांवर हलवले, जिथे ते नंतर आरामात बसले होते,” असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे.

“आमच्या नियमित धुरीकरण प्रयत्नांनंतरही, जमिनीवरील ऑपरेशन दरम्यान कधीकधी कीटक विमानात प्रवेश करू शकतात. या घटनेचे स्रोत आणि कारण शोधण्यासाठी एअर इंडिया व्यापक चौकशी करेल आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना राबवेल,” असे एका प्रवक्त्याने सांगितले.



हेही वाचा

मुंबईत डेंग्यूच्या रुग्णात वाढ

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावरून रोपवे बांधणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा