२० रूपयाची नवी नोट लवकरच चलनात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रिझर्व्ह बँकेनं २० रूपयांच्या नव्या नोटेचा फोटो जारी केला आहे. लवकरच ही नवी नोट चलनात येणार आहे. नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेनं ५०० आणि २ हजार रूपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. त्यानंतर १० आणि ५० रूपयांचीही नवी नोट जारी करण्यात आली होती.

नव्या रंगात नोट

२० रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिळव्या रंगाला एकत्र करून तयार करण्यात आला आहे. हा रंग लिंबाच्या रंगासारखा असेल. तसंच या नोटेच्या मागील बाजूस एल्लोरा लेणीचं चित्र असेल. तसंच अधिकृत नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापरही नियमांप्रमाणे या नोटेवर करण्यात आला आहे. यापूर्वी चलनात असलेल्या २० रूपयांच्या नोटा कायम राहणार असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा -

'असे' शोधा तुमच्या घराजवळील मतदान केंद्र


पुढील बातमी
इतर बातम्या