मुंबईतील आणखी ६ पूल धोकादायक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ३१ हून अधिक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनानं सर्व पुलांची फेरतपासणी केली असता यामध्ये आणखी ६ पूल धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. यामुळं उपनगरातील एकूण १७ पूल अतिधोकादायक ठरल्याचं समजत आहे. हिमालय पादचारी पूलाप्रकरणी स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज देसाईला अटक करण्यात आली असून, पूर्व व पश्चिम उपनगरातील सर्व पुलांचं पुन्हा एकदा आॅडिट करण्यात आलं आहे.

सर्व पुलांचं आॅडिट

सर्व पुलांचं आॅडिट केलं असता पहिल्या आॅडिटमध्ये उपनगरातील ११ पूल अतिधोकादायक असल्याची माहिती समोर आली. यामध्ये ६ पश्चिम उपनगरात तर ५ पूर्व उपनगरातील पूल आहेत. दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांच्या आॅडिटबाबत शंका निर्माण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील १५० आणि पूर्व उपनगरातील ६४ पुलांचं मागील महिन्यात पुन्हा आॅडिट करण्यात आलं आहे. यामध्ये आणखी ६ पूल धोकादायक असल्याचं समोर आलं आहे.

२५३ पुलांची पाहणी

हिमालया पूलाच्या दुर्घटनेनंतर एकूण २५३ पुलांची पाहणी करून आॅडिट करण्यात आलं होतं. यामध्ये शहरातील ३९, पश्चिम उपनगरातील १५०, पूर्व उपनगरातील ६४ पुलांचे आॅडिट करण्यात आलं. तसंच, या ऑडिटमध्ये १४ पूल अतिधोकादायक असून यामधील ३ शहरातील आणि ११ उपनगरातील आहेत. त्याशिवाय ६१ पुलांची मोठी दुरुस्ती करणं बंधनकारक असून १०७ पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्याचं सुचविण्यात आलं आहे.


हेही वाचा -

एसी लोकलची एप्रिलमध्ये १ कोटी ८३ लाख कोटींची कमाई

एसटीच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी टोलफ्री क्रमांक


पुढील बातमी
इतर बातम्या