महापारेषणमध्ये ८५०० पदांसाठी भरती, उर्जामंत्री नितिन राऊत यांची घोषणा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यातील ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत ८५०० रिक्त पदं भरली जाणार आहे. भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक श्रेणीतील ही पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी दिले. 

 या ८५०० पदांपैकी तांत्रिक संवर्गातील ६७५० पदे व अभियंता संवर्गातील १७६२ पदं आहेत. या पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करत आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी या भरतीचा प्रस्ताव तयार करून सादर केला. शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. या भरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे २००५ मध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाले. त्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेली. मात्र, या पदांची भरती करण्यात आली नव्हती. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच ही पदं भरली जाणार आहेत. त्यामुळे कोरोना काळात राज्यात सरकारी नोकरीची संधी हजारो तरुणांना उपलब्ध होणार आहे.


हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या १४ लाख चाचण्यांचा टप्पा पार

खाजगी सुरक्षारक्षकांना लोकलने प्रवासाची परवानगी


पुढील बातमी
इतर बातम्या