Advertisement

खाजगी सुरक्षारक्षकांना लोकलने प्रवासाची परवानगी

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या खाजगी सुरक्षारक्षकांनी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली होती.

खाजगी सुरक्षारक्षकांना लोकलने प्रवासाची परवानगी
SHARES

डॉक्टर, नर्स, पोलीस, महिला यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या जवळपास सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांना मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी याआधी देण्यात आली आहे. आता खाजगी सुरक्षा रक्षकांना देखील लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या खाजगी सुरक्षारक्षकांनी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली होती.

या पत्रात म्हटलं होतं की, लाॅकडाऊनमध्ये आम्ही मागील ७ महिन्यांपासून मोठमोठ्या कंपन्या, रुग्णालये, महत्त्वाची ऑफिसेस, गाड्यांचे शोरूम या ठिकाणी या काळात वाहतूक सेवा उपलब्ध नसताना देखील सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी आर्थिक जादा भुर्दंड सहन करत आपली सेवा निष्ठेने बजावली आहे. त्यामुळे आमची राज्य सरकारला विनंती आहे की,  राज्य सरकारने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बोर्डाला लोकलने प्रवास करण्याची मुंबईत परवानगी दिली आहे.

आम्हाला देखील मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी. कारण आमच्या सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य असणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेतील कर्मचारी हे मुंबई उपनगरातुन येत असतात. यातील बहुतेक कर्मचाऱ्यांना १२ ते १३ हजार रुपये पगार आहे. त्यांना महिन्याला मुंबई उपनगरातुन कामासाठी मुंबईत येण्यासाठी ३५०० ते ४ हजार रुपये इतका खर्च येत आहे. हा खर्च या सर्व कर्मचार्ऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी. ही मागणी लक्षात घेत आता खाजगी सुरक्षा रक्षकांना आपले ओळखपत्र दाखवून लोकलने प्रवास करता येणार आहे.



हेही वाचा -

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय? 

वकिलांना ‘या’ अटीवर लोकल प्रवासाची मुभा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा