KDMC कर्मचाऱ्यांची महाशिवरात्रीसह शनिवार आणि रविवारची सुट्टी रद्द

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी असे 3 दिवस केडीएमसीचे प्रत्येक कार्यालय या आठवड्यात  सुरू राहणार असल्याचे केडीएमसीच्या आयुक्त इंदू राणी जाखर यांनी सांगितले.

तसेच पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमून दिलेली नियमित कामे करावी लागतील, असे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे उद्या महाशिवरात्रीची सार्वजनिक सुट्टी आणि त्याला लागूनच शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

मार्चअखेर असल्याने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी या सुट्या रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते. या शक्यतेमुळे केडीएमसीने प्रलंबित कामे मार्गी लावण्याची घाई केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर या सुट्या रद्द करण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या रविवारी ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालक कर्मचारी आठवडाभर अगोदर दिवसरात्र मेहनत घेत होते. महाशिवरात्री शुक्रवारी येत असल्याने तसेच शनिवार व रविवार सलग तीन दिवस सुट्टी असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्टीचे नियोजन केले होते. मात्र आयुक्त जाखड यांच्या परिपत्रकामुळे अधिकारी व कर्मचारी नाराज झाले आहेत.

8 मार्च ते 10 मार्च ही सार्वजनिक सुट्टी असली तरी या दिवशी कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रत्येक कार्यालय सुरू राहणार आहे.

तसेच महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली नियमित कामे करावीत, त्याचप्रमाणे उपायुक्त सामान्य प्रशासन यांनी विभागनिहाय बायोमेट्रिक हजेरी अहवाल उपरोक्त नमूद कालावधीत आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आले आहे.


हेही वाचा

पालघर जिल्ह्यातील रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी निधीला मंजूर

Women's Day : महिना केवळ 1650 रुपये मानधन, 'आशा' वर्कर्सची होतेय निराशा

पुढील बातमी
इतर बातम्या