मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना आज सुट्टी जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर (School Closed Today) करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. राज्यातील इतर भागातील परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकक्षेतील परिस्थिती विचारात घेता आपत्तीच्या पूर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा तसेच त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकरण यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.


हेही वाचा

नाल्यात वाहून गेलेले चार महिन्याचे बाळ सुखरूप सापडले? फोटोमागील सत्य काय

पुढील बातमी
इतर बातम्या