Advertisement

नाल्यात वाहून गेलेले चार महिन्याचे बाळ सुखरूप सापडले? फोटोमागील सत्य काय

अंबरनाथ लोकल ठाकुर्लीजवळ (Ambernath Local News) दोन तास थांबली असता एक महिला तिच्या चार महिन्याचे बाळ आणि तिच्या काकासह रेल्वे ट्रॅकवर उतरली.

नाल्यात वाहून गेलेले चार महिन्याचे बाळ सुखरूप सापडले? फोटोमागील सत्य काय
SHARES

अंबरनाथ-कल्याण दरम्यान नाल्यात वाहून गेलेले चार महिन्याचे बाळ सुखरूप सापडले आहे की नाही यावरून अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. अनेकांनी बाळ सापडल्याचे म्हटले आहे तर काही जण हे फेक असल्याचे म्हणत आहेत. 

रेल्वे रुळावरून बाळ पडल्याच्या घटनास्थळी एनडी आर एफ ची टीम कल्याण तहसीलदार यांच्या सोबत पोहचत आहे. बाळ अद्याप मिळालेले नाही. 

सोशल मीडियावर बाळ सापडल्याची बातमी व्हायरल होत आहे. यासोबत अनेक फोटो देखील शेअर केले जात आहेत. त्यासोबत दिलेल्या मजकूरमध्ये बाळ सापडल्याचे म्हटले आहे. पण बाळ अद्याप सापडले नाही आहे. 

व्हायरल होत असलेला मेसेज आणि फोटो हे दुसऱ्या ठिकाणाचे आहेत. 


ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान अंबरनाथ लोकल पावसामुळे थांबली होती. या लोकमधून उतरून एक महिला व एक व्यक्ति सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील अरुंद रस्त्यावरून चालले होते. त्या व्यक्तिच्या हातात असलेले बाळ निसटून नाल्यात पडले. नाल्यातील पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असल्याने ते बाळ वाहून गेले. 

बाळाचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. रात्री त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम पोचली होती. मात्र अंधार असल्याने शोध कार्य पूर्ण होऊ शकले नाही. पाण्यात पडलेले बाळ अद्याप सापडू शकले नाही. 

यासंबंधात बाळ सापडल्याची चुकीची माहिती माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. ठाणे जिल्हा प्रशासनास मिळालेल्या माहितीनुसार अद्याप वाहून गेलेल्या बाळाचा तपास लागलेला नाही. 

सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार बाळ सापडल्याचे वृत्त दिले होते. पण बाळ सापडले नसल्याचे समजताच आम्ही खरी आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 

मुंबई ते कल्याण (Mumbia Local CSMT To Kalyan) मार्गावर चालणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे. अशात ठाकुर्लीनजीक एक दुर्दैवी घटना घडली आहे.

अंबरनाथ लोकल ठाकुर्लीजवळ (Ambernath Local News) दोन तास थांबली असता एक महिला तिच्या चार महिन्याचे बाळ आणि तिच्या काकासह रेल्वे ट्रॅकवर उतरली. त्यावेळी त्या काकाच्या हातून बाळ निसटलं आणि ते वाहत्या पाण्यात पडलं. आज दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.


रेल्वे ट्रॅकवरून चालताना चार महिन्याचं बाळ हातातून निसटलं अन् वाहत्या पाण्यात पडलं


ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान रेल्वे थांबल्यानंतर बाळाची आई लोकलमधून उतरली आणि ही दुर्दैवी घटना घडली.

लोकल दोन तास थांबल्यानंतर ती आई तिच्या काकासह खाली उतरली. त्यावेळी तिच्या काकाच्या हातातून ते चार महिन्याचं बाळ निसटलं आणि बाजूला असलेल्या नाल्यातील वाहत्या पाण्यात पडलं. 



हेही वाचा

Mumbai Rains Update : स्टेशनवर भयंकर गर्दी! लोकल ट्रेन विस्कळीत, पहा फोटो

20 जुलैला घरातून विचार करूनच निघा, मुंबईत यलो अलर्ट जारी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा