शहिद जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 50 लाखांची मदत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात 40 जवान शहिद झाले. या घटनेमुळे देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या शहिद जवानांच्या कुटुंबियांना  महाराष्ट्र राज्याकडून  50 लाख रुपये मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. तर  मुंबईतल्या सिद्धिविनायक ट्रस्टकडून 51 लाख रुपये आणि  पुण्यातील मेरी टेक्निकल इन्स्टिट्युटच्या माध्यमातूनही 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. 

शहिदांना देशभरातून श्रद्धांजली

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यात 40 जवान शहिद झाले. या घटनेनंतर मुंबईसह देशभरात या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. तर राजकिय पक्षांनी ही सरकारला पाठिंबा देत योग्य ती कारवाई करण्याबाबत एकमत केले. नवी दिल्लीत शुक्रवारी शहिंद पार्थिंवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, सैरक्षण मंत्री निर्मला सीतारमन, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी  श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर एका विशेष विमानाने शहिदांची पार्थिव त्यांच्या मूळ गावी शनिवारी दाखल झाली. 

शहिदांच्या कुटुंबियांना सिद्धिविनायक ट्रस्टकडून  मदत

या हल्यातील शहिद जवानांवर ओढावलेल्या दुखःत घटनेनंतर देशभरातून शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे येऊ लागला. राज्य सरकारकडून शहिद कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. तर   मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने ही गुरूवारी त्यांच्या झालेल्या बैठकीत शहिदांना श्रद्धांजली वाहत.  त्यांच्या कुटुंबियांना 51 लाखाची मदत जाहिर केली. सिद्धिविनायक मंदीरा पाठोपाठ पुण्यातील मेरी टेक्निकल इन्स्टिट्युटच्या माध्यमातूनही 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ प्रवाशांचा रेल रोको

राजकीय नेत्यांसह बॉलिवूड विश्वातून भ्याड हल्याचा निषेध

पुढील बातमी
इतर बातम्या