पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ प्रवाशांचा रेल रोको

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा स्थानकात प्रवाशांचे रेल रोको आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे नालासोपराहून विरार च्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

  • पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ प्रवाशांचा रेल रोको
SHARE

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून या हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा स्थानकात प्रवाशांचे रेल रोको आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे नालासोपराहून विरार च्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.


हल्ल्याचा निषेध

या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. मागील २ तासांपासून रेल रोको आंदोलन सुरु असल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नालासोपारा ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. लांब पल्ल्यांच्या रखडल्या

प्रवाशांच्या या रेल रोको आंदोलनामुळे लांब पल्ल्याच्या गाड्याही रखडल्या आहेत. त्याचप्रमाणं, सकाळी ऐन कामाच्या वेळेला हा निषेध होत असल्याने अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत जात आहेत.आदोलकांवर लाठीचार्ज

अखरे चार तासानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेकीचा प्रकारही घडला असून, यामध्ये एक पोलिस जखमी झाला आहे. त्याला जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा -

बाबूजींचा सांगितीक प्रवास उलगडणार ‘आनंदयात्री’

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीरसंबंधित विषय
ताज्या बातम्या