Advertisement

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

दहावी व बारावीच्या परीक्षांना लवकरच सुरूवात होणार असून, शुक्रवारी मुंबई विद्यापीठानं बीकॉम, बीएमएम, बीएमएस यांसारख्या ५५० अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
SHARES

दहावी व बारावीच्या परीक्षांना लवकरच सुरूवात होणार असून, शुक्रवारी मुंबई विद्यापीठानं बीकॉम, बीएमएम, बीएमएस यांसारख्या ५५० अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २५ मार्चपासून या परीक्षांना सुरूवात होणार आहे. 


अभियांत्रिकीच्या तारखाही लवकरच

मुंबई विद्यापीठानं महाविद्यालयीन प्रथम व द्वितीय वर्षाच्या व विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे. येत्या २५ मार्च २०१९ पासून परीक्षांना सुरूवात होणार असून, १० जूनपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. या परीक्षांमध्ये अभियांत्रिकी शाखेचा समावेश नसून, येत्या काही दिवसांत या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान यंदा प्रथमच विद्यापीठ सत्र सहासाठी पसंतीनुसार श्रेणी पद्धत ( Choice base credit system) राबवण्यात येणार आहे. 


सर्व बाबींचा विचार

परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव कृष्णा पराड व इतर विभागाने या परीक्षांच्या तारखांचं वेळापत्रक तयार केलं आहे. हे वेळापत्रक तयार करताना त्या त्या विद्याशाखांचं ९० दिवसांचं सत्र, सुट्ट्या व इतर विविध व्यावसायिक परीक्षा यांचाही विचार करण्यात आला आहे. 


निवडणुकीमुळे तारखेत बदल

या सर्व परीक्षांचं वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार असल्यानं या परीक्षांच्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 


'या' आहेत परीक्षांच्या तारखा 


विद्यापीठाच्या परीक्षा

क्र.

परीक्षा

    परीक्षेची तारीख

१)

बी.कॉम सत्र ६

३ एप्रिल २०१९

२)

बी.एससी सत्र ६,  

बी.एससी सत्र ६ ( संगणकशास्त्र) 

बी.एससी सत्र ६ (बायोटेक)   

१२ एप्रिल २०१९

३)

बी.ए सत्र ६

१५ एप्रिल २०१९

४)

बी.एमएम. सत्र ६

१५ एप्रिल २०१९

५)

सत्र ६ च्या परीक्षा : बी.कॉम (फायनान्शियल मार्केट्स),  बी.कॉम (बँकिंग व इन्शुरन्स), बी.कॉम (अकौंटींग व फायनान्स), बी.कॉम (फायनान्शियल मॅनेजमेंट), बी.कॉम (ट्रान्सपोर्ट  मॅनेजमेंट), बी.कॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट)

२२ एप्रिल २०१९

६)

बी.एमएस. सत्र ६  

२२ एप्रिल २०१९

७)

बी.एस्सी. आयटी सत्र ६  

७  मे २०१९


महाविद्यालयीन परीक्षा

 

परीक्षा

परीक्षेची तारीख

१)

बी.ए, बी.कॉम, बी.एससी सत्र - १ व ३

२५ मार्च २०१९

२)

बी.ए, बी.कॉम, बी.एससी सत्र - ४

१६ एप्रिल २०१९

३)

बी.ए, बी.कॉम, बी.एससी सत्र - २

३० एप्रिल, २०१९

४)

बीएमएम सत्र १ व ३

२५ एप्रिल २०१९

५)

बीएमएम सत्र - २

०४ एप्रिल २०१९

६)

बीएमएम सत्र ४

१८ एप्रिल २०१९ 


विद्याशाखानिहाय  परीक्षा

अनु.क्र.

विद्याशाखा

विद्यापीठस्तरीय परीक्षा

महाविद्यालयीन परीक्षा

१)

विज्ञान व तंत्रज्ञान

१३३

२०

२)

वाणिज्य व व्यवस्थापन

९५

३६

३)

मानव्यविद्या शाखा

८९

०४

४)

आंतरविद्याशाखा

१६९

०४

 

एकूण परीक्षा 

४८६

६४

 

 


हेही वाचा -

आंगणेवाडी जत्रेसाठी १० स्पेशल गाड्या

पालिका शाळांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट
 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा