Advertisement

आंगणेवाडी जत्रेसाठी १० स्पेशल गाड्या

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही आंगणेवाडी जत्रेसाठी मध्य रेल्वेच्या वतीनं १० स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदा ही जत्रा २५ फेब्रुवारीला आहे.

आंगणेवाडी जत्रेसाठी १० स्पेशल गाड्या
SHARES

दरवर्षी मुंबईहून आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या जत्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. देवीला कौल लावून जत्रेची तारीख घोषित झाल्यापासून भक्तांना जत्रेचे वेध लागतात आणि रेल्वे बुकिंगसाठी गर्दी होते. नियमित गाड्यांव्यितिरीक्त मध्य रेल्वेला अतिरीक्त गाड्याही सोडाव्या लागतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही मध्य रेल्वेच्या वतीनं १० स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदा ही जत्रा २५ फेब्रुवारीला आहे.


सीएसएमटी-करमळी दोन गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:४० वाजता ०११५७ ही गाडी सुटणार आहे, तर करमळीहून २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ०२:०५ वाजता ०२००६ ही विशेष गाडी सुटणार आहे. या दोन्ही गाड्या थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर या स्थानकांवर थांबतील.


पुणे ते सावंतवाडी रोड ते पुणे दोन  गाड्या

०१४३१ ही विशेष गाडी पुण्याहून २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता सुटणार आहे, तर ०१४३२ ही दुसरी विशेष गाडी सावंतवाडीहून २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २:१० वाजता सुटणार आहे. या दोन्ही गाड्या लोणावळा, कर्जत, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.


सावंतवाडी रोड ते पनवेल ते सावंतवाडी रोड

०११६० ही विशेष गाडी सावंतवाडी रोडहून २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २:१० वाजता सुटणार आहे. तसंच, सावंतवाडी रोड ते पनवेल ते सावंतवाडी रोडदरम्यान दोन विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. 


एलटीटी ते सावंतवाडी ते एलटीटी दोन गाड्या

०११६१ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून (एलटीटी) २५ फेब्रुुवारी रोजी मध्यरात्री १:१० वाजता सुटणार आहे, तर ०११६२ ही विशेष गाडी सावंतवाडी रोडहून २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २:१० वाजता सुटणार आहे. या दोन्ही गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबतील.


पनवेलहूनही विशेष गाडी

पनवेलहून आंगणेवाडीच्या जत्रेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ०११५९ ही विशेष गाडी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४० वाजता सुटणार आहे. तसंच, ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा या स्थानकांवर थांबणार आहे.



हेही वाचा -

खुशखबर! चार लोकल्सना अतिरिक्त थांबे

Movie Review : गली बॉय' के मन की 'मुराद'!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा