Advertisement

खुशखबर! चार लोकल्सना अतिरिक्त थांबे

पश्चिम रेल्वेच्या विरार आणि डहाणू मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर. शुक्रवार १५ जानेवारी पासून चर्चगेट ते मुंबई सेट्रल स्थानकांमधील मरिन लाइन्स, चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड या स्थानकांवर चार लोकल्सना अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.

खुशखबर! चार लोकल्सना अतिरिक्त थांबे
SHARES

पश्चिम रेल्वेच्या विरार आणि डहाणू मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर. शुक्रवार १५ जानेवारी पासून चर्चगेट ते मुंबई सेट्रल स्थानकांमधील मरिन लाइन्स, चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड या स्थानकांवर चार लोकल्सना अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. या चार लोकल्मसमधील तीन विरार, तर एक डहाणू लोकल असेल.


प्रवाशांची मागणी

पश्चिम रेल्वे मार्गावरील विरारपासून डहाणूपर्यंतचे अनेक चाकरमानी मुंबईत कामासाठी येतात. परंतु, रेल्वे स्थानकांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळं त्यांना धक्कीबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून विरार, डहाणूच्या प्रवाशांनी चर्चेगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सर्व स्थानकांवर लोकल्सना अतिरिक्त थांबा देण्याची मागणी केली होती. रेल्वेनं ही मागणी मान्य केल्यानं मरिन लाइन्स, चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड या स्थानकांवर चार लोकल्सना थांबा मिळाला आहे.


अरविंद सावंत यांचं पत्र

या शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवलं होतं.या पत्रात त्यांनी प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून लवकरात लवकर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान लोकलला अतिरिक्त थांबा देण्याची मागणी केली होती.


या लोकल्सना अतिरिक्त थांबे

  • सकाळी ९.१० वाजताची चर्चगेट ते विरार लोकल.
  • सकाळी ९.३३ वाजताची चर्चगेट ते विरार लोकल.
  • सकाळी १०.३ वाजताची चर्चगेट ते डहाणू लोकल.
  • सकाळी १०.४३ वाजताची चर्चगेट ते विरार लोकल.



हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, पण त्या नऊ दिवसांचा पगार कट

आणखी वेगात धावणार राजधानी एक्सप्रेस!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा