Advertisement

पालिका शाळांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुलभ व व्यापक व्हावी यासाठी ७१४ शाळांमध्ये इंटरनेट व दूरध्वनी जोडणी करण्यात येणार आहे.

पालिका शाळांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट
SHARES

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुलभ व व्यापक व्हावी यासाठी ७१४ शाळांमध्ये इंटरनेट व दूरध्वनी जोडणी करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, याचा उपयोग शैक्षणिक वापरासह विविध प्रशासकीय बाबींसाठी व शाळांमधील अंतर्गत संपर्कासाठी होणार आहे.


अनलिमिटेड कॉल्स-इंटरनेट

महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने पालिका शाळांसाठी 'कॉम्बो ४५०' हा प्लान तयार केला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स व इंटरनेट वापराची सुविधा देण्यात येणार असून, प्रत्येक दूरध्वनी जोडणीसाठी दर महिना ५३२ रूपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी लागणारे मॉडेम एमटीएनएलद्वारे मोफत देण्यात येणार आहे.


पालकांकडे पोहोचणार माहिती

या इंटरनेट व दूरध्वनी जोडणी प्रकल्पामुळे पालिका पालिका शाळांमध्ये संपर्क साधणं सुलभ होणार आहे. याचा उपयोग राज्य व केंद्र सरकारच्या संकेतस्थळांवर विविध योजनांची माहिती भरण्यासही होणार आहे. यामुळे पालकांना आपला पाल्य शाळेत अभ्यास करतो का, वर्गात मस्ती करतो की नाही, याबाबत शिक्षकांशी किंवा मुख्यध्यापकांशी थेट संवाद साधणं शक्य होणार आहे.


७१४ शाळांमध्ये सेवा

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून यापूर्वीच काही पालिका शाळांमध्ये इंटरनेट जोडणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं निदर्शनास आल्यानं पालिका प्रशासनाच्या वतीनं ७१४ शाळांमध्येही ही सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ५७९ प्राथमिक, तर १३५ माध्यमिक शाळांचा समावेश आहे.



हेही वाचा - 

खुशखबर! चार लोकल्सना अतिरिक्त थांबे

युतीबाबत उद्धव ठाकरेंशी सकारात्मक चर्चा -मुख्यमंत्री



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा