लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल दीडतासाच्या या चर्चेत मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकात(दादा) पाटील आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हे ही उपस्थित होते. दरम्यान या चर्चेनंतर युतीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपच्या युतीबाबत अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. या सर्व प्रश्नांना गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला. प्रश्न आकडे आणि मानपानाचा नसून प्रश्न हा राज्यातील विविध योजना आणि नागरिकांच्या गरजेचे होते. शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न शिवसेनेकडून ठेवण्यात आल्यानंतर त्यावर सकारात्मक चर्चा झाली. ते प्रश्न सोडवण्यास भाजप ही आग्रही असून तिच मानसिकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दोघांचे ही या प्रश्नांवर एकमत झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. योग्य प्रकारे पुढे जाऊ आणि युतीबाबत जो निर्णय होईल तो लवकरच जाहीर करू’’, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा-
निरूपम यांना हटवण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते दिल्लीत तळ ठोकून
फेसबुक राजकिय जाहिरातदारांची नावं जाहीर करणार