सिद्धिविनायक मंदिर येथील सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्याचा अंदाजित खर्च 78,01,20,038 रुपये आहे. या कामासाठी M/s Engineers Studio Pvt Ltd या स्ट्रक्चरल कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात आली आहे.
या टप्प्यातील कामांमध्ये मंदिराच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर स्टोन क्लॅडिंग, मंदिराच्या उत्तरेकडील बाजूस छप्पर, मंदिर परिसरातील फरशी, लाईट्स, प्लंबिंग आदी कामांचा समावेश आहे. तसेच, सुमारे 129 वाहनांसाठी (-2 मजले) बेसमेंट पार्किंगची सुविधा उभारण्याचे कामही करण्यात येणार आहे.
बीएमसीच्या G-नॉर्थ विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नुकतेच टेंडर काढले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “काम काही दिवसांत सुरू होईल. भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतीक्षा आहे. येत्या आठवड्यातच भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.”
संपूर्ण सुशोभीकरण आणि सुधारणा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. दादर येथील हे प्रसिद्ध मंदिर लवकरच ‘अन्नदान’ सेवा सुरू करणार आहे, ज्यामध्ये भाविकांना मोफत जेवण दिले जाईल.
शिवसेना नेते सदा सरवणकर, जे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले,
“प्रसादालय शिर्डी साई बाबा मंदिर येथील सुविधेसारखे असेल. भाविकांना रोटी, भाजी, डाळ, भात आणि गोड पदार्थ असे मोफत जेवण दिले जाईल. भाविकांना संपूर्ण आणि समाधानकारक अनुभव देण्याचा आमचा उद्देश आहे.”
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट सध्या मंदिरालगत असलेल्या ‘राम मॅन्शन’ या तीन मजली इमारतीच्या खरेदीच्या अंतिम टप्प्यात आहे. ही खरेदी पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसराचा विस्तार आणि गर्दी व्यवस्थापन अधिक सुधारण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा