सायन उड्डाणपूलाच्या (Sion Flyover) दुरुस्तीच्या कामाचा तिसरा टप्प्याला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. ६ मार्च रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते ९ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत दरूस्तीचं काम सुरू राहणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी या उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सायन उड्डाणपुलाच्या सांध्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे या पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सायन उड्डाणपूल (Sion Flyover) हा दक्षिण मुंबईतील एक महत्वाचा उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलावरून मुंबईहून ठाणे, वाशी आणि इतर ठिकाणी प्रवास करता येतो. मात्र, आता काही दिवसांसाठी हा पूल बंद राहणार असल्यानं वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यात विकेंड असल्यानं मोठ्या वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सायन उड्डाणपूलाच्या दुरूस्तीचं आतापर्यंत २ टप्प्यांतील काम झालं असून, ६४ बेअरिंग बदलण्यात आले आहेत. दुरुस्ती कामाचा तिसरा टप्पा शुक्रवारपासून सुरू होत आहे. यामध्ये १६ बेअरिंग बदलले जाणार आहेत. या दरम्यान पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या पुलाचे बेअरिंग बदलण्यासाठी पुढील ५ आठवडे दर गुरुवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत पूल बंद ठेवण्यात येणार आहे.
एमएसआरडीसीने (msrdc) सायन उड्डाणपूल (Sion Flyover) १९९९ मध्ये बांधला. २०१७ मध्ये आयआयटी बॉम्बेने उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural audit) करून उड्डाणपुलाचे बेअरिंग्ज (Bearings) बदलण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आता सायन उड्डाणपुलाच्या बेअरिंग्ज बदलण्याचं काम सुरू आहे.
हेही वाचा -
मध्य रेल्वेचे सीएसएमटी पहिलं 'इट राइट स्टेशन'