Advertisement

मध्य रेल्वेचे सीएसएमटी पहिलं 'इट राइट स्टेशन'

मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील मुख्य स्थानक छत्रपती शिवजी महाराज टर्मिनस हे 'इट राइट स्टेशन' ठरलं आहे.

मध्य रेल्वेचे सीएसएमटी पहिलं 'इट राइट स्टेशन'
SHARES

मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील मुख्य स्थानक छत्रपती शिवजी महाराज टर्मिनस हे 'इट राइट स्टेशन' ठरलं आहे. रेल्वे प्रवाशांना आरोग्यपूर्ण अन्नपदार्थांचा पर्याय निवडण्यासाठी 'योग्य खाद्यपदार्थ रेल्वे स्थानक मोहीम' रेल्वे मंत्रालयाने राबविली होती. 

'इट राइट इंडिया' या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेचे पहिले 'इट राइट स्टेशन' हे सीएसएमटी ठरले आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छता, ऋतुमानानुसार उपलब्ध खाद्यपदार्थ, निर्मिती आणि वाहतूक, उपलब्धता, विक्रीची ठिकाणे, वाया जाणाऱ्या पदार्थांचे व्यवस्थापन, स्थानिक खाद्यपदार्थ या निकषांवर सीएसएमटीची निवड करण्यात आली. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाला घोषित झालेले भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे प्रमाणपत्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांना बुधवारी प्रदान करण्यात आले. 

'सीएसएमटी'तील फूडप्लाझा, जनआहार, बेसकिचन येथील तपासणीअंती प्राधिकरणाने ५ स्टारचे मानांकन खाद्यपदार्थांना दिले आहे. तपासणीत खाद्यपदार्थांसह कचरा व्यवस्थापन-वर्गीकरण, खाद्यपदार्थांची हाताळणी यांचाही आढावा घेण्यात आल्याचे समजतं.

याआधी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकाला प्राधिकरणाच्या प्रमाणपत्राने गौरवण्यात आलं. रेल्वे स्थानकांत येणाऱ्या प्रवाशांना पौष्टिक आणि योग्य अन्नपदार्थ मिळावे यासाठी सन २०१८मध्ये 'एफएसएसएआय'ने विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत रेल्वे स्थानकांचादेखील समावेश करण्यात आला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा