महाराष्ट्रातील (maharashtra) सर्व जिल्ह्यांमध्ये पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रांतर्गत एका विशेष प्रकल्पात 15,000 तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Sambhuraj desai) यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन विभागाने महाराष्ट्रातील मुंबईसह (mumbai) सर्व जिल्ह्यांमध्ये पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत आयोजित बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.
यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, टीएचएस कौन्सिलचे संचालक पर्यटन आणि आतिथ्य कौशल्य परिषद) राजीव कांत उपस्थित होते.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, जर तरुणांना पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण मिळाले तर पर्यटन क्षेत्रात (Tourism) रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
यामुळे राज्यात पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटन विभागाने कौशल्य विकास विभागाशी समन्वय साधून प्रस्ताव तयार करावा. सरकारच्या मंजुरीनंतर, पहिल्या टप्प्यात राज्यातील 15 हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याचा पर्यटन विभागाचा मानस आहे.
पर्यटन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रिसॉर्ट्समधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील पर्यटन कौशल्यांवर काम करणाऱ्या विविध संस्थांचा अभ्यास करून त्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले पाहिजे, असेही पर्यटन मंत्री देसाई म्हणाले.
हेही वाचा