आगामी गणेशोत्सवात लाखो चाकरमानी आणि भाविक कोकणात मोठ्या श्रद्धेने जातात. या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवासीसंख्येच्या तुलनेत रेल्वेसेवेवर अतिरिक्त ताण येतो. तसेच रेल्वेसेवा अपुरी पडते.
यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर, सोयीस्कर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
तसेच त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असल्याने रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
सावंतवाडी रोड (sawantwadi road) स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून जारी करण्यात आली आहे.
कोकणातील प्रवासी, पर्यटक आणि चाकरमान्यांची वाढती गर्दी तसेच प्रवासादरम्यान होणारी गैरसोय लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई (mumbai), ठाणे (thane), दिवा, कल्याण आणि पुणे (pune) परिसरातून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना या विशेष गाड्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
अतिरिक्त रेल्वे सेवांमुळे तिकिटांची टंचाई आणि ऐनवेळी होणारी प्रवाशांची धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.
मेमू सेवेमुळे स्थानिक प्रवाशांचीही सोय होणार आहे. सावंतवाडी रोड स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना मिळालेल्या थांब्यामुळे सिंधुदुर्ग, सावंतवाडी आणि परिसरातील प्रवासी व पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.
हेही वाचा