मुंबई (mumbai) ते नांदेड (nanded) धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
तसेच त्यामुळे या बदलांची दखल घेऊन प्रवाशांनी नियोजन करण्याचे आवाहन यावेळी देण्यात आहे.
मध्य रेल्वेवर धावणाऱ्या या वंदे भारतला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या बदललेल्या वेळांचा मोठा परिणाम यांच्यावर होणार आहे.
मुंबई ते हुजूर साहिब नांदेडपर्यंत वंदे भारत हाय स्पीड ट्रेनची सुरुवात 30 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली.
या मार्गावरील इतर गाड्यांना प्रवासासाठी 11 तासांचा कालावधी लागतो. पण वंदे भारतमुळे मुंबई ते नांदेड प्रवास अवघ्या 9 तास 40 मिनिटांत पूर्ण होतो. त्यामुळे ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन आहे.
मनमाड जंक्शनमार्गे (manmad) धावणाऱ्या या ट्रेनला मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र आता मध्य रेल्वेकडून (central railway) या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत सुधारणा करण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक 20706 मुंबई-हजूर साहिब वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटी येथून 13.10 ऐवजी 13.15 वाजता रवाना होईल.
तसेच, नांदेड येथे ही ट्रेन 22.50 ऐवजी 22.25 वाजता पोहोचणार आहे. त्यामुळे या प्रवासात प्रवाशांचा अर्धा तास वेळ वाचणार असल्यामुळे प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
दरम्यान, परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 20705 हजूर साहिब नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस 5 ऐवजी 5.20 ला रवाना होईल. तसेच, सीएसएमटी स्थानकावर 14.25 ऐवजी 14.15 वाजता पोहचणार आहे. या प्रवासातही अर्धा तास वेळ वाचणार आहे.
हे बदललेले वेळापत्रक 3 मे 2026पासून लागू होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड दरम्यान ट्रेन आठ स्थानकांवर थांबते. यामध्ये दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जंक्शन या स्थानकांचा समावेश आहे.
या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये वातानुकूलित चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार अशा दोन प्रकारच्या डब्यांचा समावेश आहे.
सीएसएमटी मुंबई ते हजूर साहिब नांदेड दरम्यानच्या एसी चेअर कारचे तिकीट 1,790 रुपये आहे, तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट 3,135 रुपये आहे.
हेही वाचा