पनवेल महापालिका क्षेत्रात १० दिवसांचा कडक लाॅकडाऊन

पनवेल महापालिका क्षेत्रात या आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पनवेल महापालिकेने कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवार ३ जुलैच्या रात्री ९ वाजल्यापासून ते सोमवार १३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत १० दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

 

पुढील २ दिवसात नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे  पालन करून तोंडाला मास्क लावून पुढील १० दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तू , भाजीपाला, औषधे आणि फळे यांचा साठा करून ठेवावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे .

पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी १३६ नवीन रुग्ण सापडले. दिवसेंदिवस या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.   पनवेलमध्ये लॉकडाऊन करावा अशी मागणी याआधीही अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केली होती. त्यामुळे महापालिकने १० कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.  या लॉकडाऊन काळात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्या दोन दिवसांत १० दिवस पुरेल इतक्या आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.


हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार


पुढील बातमी
इतर बातम्या