Advertisement

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार

महाराष्ट्राने गुरूवार २ जुलै २०२० रोजी तब्बल १० लाख कोरोना (Covid-19) चाचण्यांचा टप्पा पार केला. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना चाचण्या करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे.

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार
SHARES

महाराष्ट्राने गुरूवार २ जुलै २०२० रोजी तब्बल १० लाख कोरोना (Covid-19) चाचण्यांचा टप्पा पार केला. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना चाचण्या करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे. विरोधकांकडून सातत्याने कोरोना चाचण्या कमी होत असल्याचा आरोप होत असताना हा आकडा पुढं आलं आहे. 'चेस द व्हायरस' करत असताना ट्रेस, टेस्ट, ट्रीट हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली. 

राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खाजगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६३३४ एवढे आहे.  गेल्या २४ तासांतील आकडेवारीनुसार १ जुलैपर्यंत महाराष्ट्रात ९,००,४२३ कोरोना चाचण्यांची नोंद झाली होती. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत ४,७८,३३६ तर १,७७,४५४ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १,८०,२९८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८०५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदर हा ४.४७ टक्के इतका आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडून ९४,०४९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १२६४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील मृत्यूदर हा १.३४ इतका आहे. तर दिल्लीत ८९,८०२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २८०३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील मृत्यूदर ३.१२ इतका आहे. राज्यात ५ लाख ७२ हजार  ३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ७४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील: १ जुलै २०२० पर्यंत

  • मुंबई: बाधित रुग्ण- (७९,१४५), बरे झालेले रुग्ण- (४४,७९१), मृत्यू- (४६३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,६७५)
  • ठाणे: बाधित रुग्ण- (३९,३१६), बरे झालेले रुग्ण- (१५,६२१), मृत्यू- (१०१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६३१)
  • पालघर: बाधित रुग्ण- (६०६४), बरे झालेले रुग्ण- (२६५४), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२९९)
  • रायगड: बाधित रुग्ण- (४५६३), बरे झालेले रुग्ण- (२१८६), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२७३)
  • रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (६१४), बरे झालेले रुग्ण- (४४५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)
  • सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)
  • पुणे: बाधित रुग्ण- (२३,३१७), बरे झालेले रुग्ण- (११,५४५), मृत्यू- (७८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,९८९)
  • सातारा:  बाधित रुग्ण- (१११७), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४३)
  • सांगली: बाधित रुग्ण- (३९६), बरे झालेले रुग्ण- (२२८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७)
  • कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (७१७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०)
  • सोलापूर: बाधित रुग्ण- (२६५२), बरे झालेले रुग्ण- (१५६३), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२०)
  • नाशिक: बाधित रुग्ण- (४३७६), बरे झालेले रुग्ण- (२३२२), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३२)
  • अहमदनगर: बाधित रुग्ण- (४३२), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)
  • जळगाव: बाधित रुग्ण- (३५०७), बरे झालेले रुग्ण- (२००६), मृत्यू- (२४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५६)
  • नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७८), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९९)
  • धुळे: बाधित रुग्ण- (१०९६), बरे झालेले रुग्ण- (५९४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४४)
  • औरंगाबाद: बाधित रुग्ण- (५६५१), बरे झालेले रुग्ण- (२४६०), मृत्यू- (२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३५)
  • जालना: बाधित रुग्ण- (५८३), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२२)
  • बीड: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)
  • लातूर: बाधित रुग्ण- (३५०), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३६)
  • परभणी: बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)
  • हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
  • नांदेड: बाधित रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण (२३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६)
  • उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२२३), बरे झालेले रुग्ण- (१७१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)
  • अमरावती: बाधित रुग्ण- (५८७), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०)
  • अकोला: बाधित रुग्ण- (१५४४), बरे झालेले रुग्ण- (१०७९), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८६)
  • वाशिम: बाधित रुग्ण- (१०६), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)
  • बुलढाणा: बाधित रुग्ण- (२५१), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)
  • यवतमाळ: बाधित रुग्ण- (२९६), बरे झालेले रुग्ण- (२०९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७)
  • नागपूर: बाधित रुग्ण- (१५०६), बरे झालेले रुग्ण- (११९८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)
  • वर्धा: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)
  • भंडारा: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)
  • गोंदिया: बाधित रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
  • चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)
  • गडचिरोली: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)
  • इतर राज्ये: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)
  • एकूण: बाधित रुग्ण-(१,८०,२९८), बरे झालेले रुग्ण-(९३,१५४), मृत्यू- (८०५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह रुग्ण-(७९,०७५)
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा