टाटा पॉवरचं जैवविविधता मालिकेतील तिसरं पुस्तक प्रकाशीत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेप्टाइल्स ऑफ द नॉर्दर्न वेस्टर्न घाट्सया जैवविविधता मालिकेतील तिसरं पुस्तक टाटा पॉवरनं ईला फाऊंडेशनच्या सहयोगानं सोमवारी प्रकाशीत केलं आहे. हे पुस्तक म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १२३ सुंदर व सर्वाधिक धोक्यातील प्रजातींचं संकलन आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवून ठेवण्यात या प्रजातींचं योगदान मोठं आहे.

जैवविविधतेच्या समृद्धीची माहिती

जगातील सर्वांत महत्त्वाच्या जैवविविधता केंद्रांपैकी एक असलेल्या पश्चिम घाटातील साप, मगरी, कासवे, पाली, सरडे यांच्या प्रजातींविषयीच्या माहितीचं संकलन या पुस्तकामध्ये करण्यात आलं आहे. पश्चिम घाटाच्या उत्तर भागात गेल्या अनेक वर्षांपासून जतन करण्यात आलेल्या या जैवविविधतेच्या समृद्धीची माहिती या पुस्तकातून मिळतेया पुस्तकाचं प्रकाशन कंपनीच्या पारेषण व वितरण विभागाचे अध्यक्ष मिनेश दवे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी पुस्तकाचे सहलेखक व पर्यावरणवादी आणि ईला फाऊंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे तसंच टाटा पॉवरमधील विभागाचे हेड इस्टेट विवेक विश्वासराव उपस्थित होते.

पुस्तकाची वैशिष्ट्ये

  • पश्चिम घाटाच्या उत्तर भागातील सरपटच्या प्राण्यांवर आधारित पहिलंच पुस्तक.
  • जंगलात कॅमेराबद्ध केलेल्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १२३ प्रजातींची तपशीलवार माहिती.
  • सापाच्या विविध प्रजातींवर भर; मगरी, कासवे, पाली व सरड्यांच्या अनेक प्रजातींचाही यात समावेश.
  • त्याचप्रमाणं, त्यांच्या संवर्धनविषयक परिस्थितीची माहितीही देण्यात आली आहे.
  • वनअभ्यासक, शेतकरी, जीवशास्त्रज्ञ, अध्यापक, पर्यावरणवादी आणि हौशी अभ्यासकांसाठी उपयुक्त.
  • कुशल फोटोग्राफर्सनी काढलेल्या ५००हून अधिक दर्जेदार फोटोंचा तसेच प्रख्यात कलावंतांनी केलेल्या इलस्ट्रेशन्सचा पुस्तकात समावेश.

हेही वाचा -

नोकरीच्या बहाण्याने तरूणांची फसवणूक, आरोपींकडून लाखोंची रोकड हस्तगत


पुढील बातमी
इतर बातम्या