नोकरीच्या बहाण्याने तरूणांची फसवणूक, आरोपींकडून लाखोंची रोकड हस्तगत

आरोपींच्या घराची झाडाझडती घेतल्यावर लाखो रुपयांचा घबाड पोलिसांच्या हाती लागलं. पोलिसांनी आरोपी मनिषच्या बनारस येथील घरातून २५ लाख, तर आझमगढ येथील घरातून लाखोंचे मौल्यवान दागिने हस्तगत केले आहेत.

नोकरीच्या बहाण्याने तरूणांची फसवणूक, आरोपींकडून लाखोंची रोकड हस्तगत
SHARES

रेल्वेत नोकरीला लावण्याचं आमिष दाखवून मुंबईसह राज्यातील शेकडो तरुण-तरुणींकडून पैसे लुबाडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत या टोळीतील राजेशकुमार, मनिष सिंग, सिमा पवार या तिघांना पोलिसांनी ताब्यातही घेलं होतं. या आरोपींच्या घराची झाडाझडती घेतल्यावर लाखो रुपयांचा घबाड पोलिसांच्या हाती लागलं. पोलिसांनी आरोपी मनिषच्या बनारस येथील घरातून २५ लाख, तर आझमगढ येथील घरातून लाखोंचे मौल्यवान दागिने हस्तगत केले आहेत.


नेमकं प्रकरण काय ?

ऐरोली परिसरात राहणारे तक्रारदार सखाराम लांडगे कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी रेल्वे भरतीत फॉर्म भरला होता. त्याचवेळी त्यांची ओळख राजेशकुमार, मनिष सिंग, संजीव रय आणि सिमा पवार यांच्याशी झाली. या चौघांनी रेल्वेत ओळखीवर पैसे भरून तिकिट तपासणी पदावर नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन लांडगे यांना दिलं. त्यानुसार, लांडगे यांनी त्याच्यासह त्यांच्या १८ मित्रांचे मिळून ७० लाख रुपये आरटीजीएसटीद्वारे या चौघांकडं जमा केले.


सिलेक्शन झाल्याची यादी

या चौकडीनं पैसे घेतल्यानंतर १८ जणांना काही दिवसांतच रेल्वेचं अपॉईंटमेंट लेटर, पोस्टिंग लेटर, पेमेंट स्लिप, आणि ओळखपत्र पोस्टानं पाठवलं. एवढंच नव्हे, तर त्या १८ जणांना विश्वास पटावा, त्यासाठी आरोपींनी इंटरनेटवर रेल्वेची बनावट साईट बनवून त्यावर या १८ जणांचं सिलेक्शन झाल्याची यादी जाहीर केली. मात्र, यातील एका तरुणानं रेल्वेच्या सीएसटी येथील कार्यालयात काही त्रुटीबाबत संपर्क साधला असता. रेल्वेनं अशा प्रकारे कुठलीही नियुक्तीची यादी जाहीर केली नसल्याचं सांगितलं.

 त्यानंतर, हे सर्व रॅकेट वाराणसीतून चालत असल्याचं लक्षात आलं. या आरोपींनी मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर प्रदेश कोलकत्ता येथील अनेक तरूणांना याचप्रकारे फसवल्याचं तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी या चौघांवर भा..वि कलम ४१९, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ४७३, ४७५, १२०() सह कलम ६६(), ६६() माहिती व तंत्रज्ञान कायदा सन २००० अन्वये गुन्हा नोंदवून या तिघांना अटक केली.


लाखोंचे दागिने

पोलिसांना चौकशीत मनिषच्या बनारस येथील घरातून २५ लाख रुपये हस्तगत केले. तर त्याच्या आझमगढ येथील घरातून लाखोंचे मौल्यवान दागिने ताब्यात घेतले. हस्तगत केलेलं सोनं फसवणुकीच्या पैशातून घेतल्याचं पुढे आलं आहे. राजेश हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, या प्रकरणात अन्य ७ ते ८ जणांचा सहभाग निश्चित झाला आहे. त्यांना अटक करणं अद्याप बाकी आहे.


फिल्म प्राॅडक्शन कंपनी

तपासात राजेश फिल्म प्राॅडक्शन कंपनी चालवत असल्याचं पुढं आलं आहे. त्यात सीमा काम करायची. तरूणांना जाळ्यात ओढण्याचं काम राजेशनं तिला दिलं होतं. या प्रकरणात राजेशच्या एकाच खात्यावर फसवणुकीचे सर्व पैसे जमा झाले असून त्यातूनच त्याने अनेकांना पगार दिल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. आतापर्यंत या खात्यावर २ कोटीचा व्यवहार झाल्याचे निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा ११ चे पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

MHT-CET निकाल जाहीर, मुंबईच्या किमया शिकारखानेला ९९.९८ टक्के

यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासा देणारा ठरेल - महापौर विश्वनाथ महाडेश्वर



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा