Advertisement

MHT-CET निकाल जाहीर, मुंबईच्या किमया शिकारखानेला ९९.९८ टक्के

औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल ९९.९८ टक्के गुणांसह टॉपर ठरली आहेत.

MHT-CET निकाल जाहीर, मुंबईच्या किमया शिकारखानेला ९९.९८ टक्के
SHARES

औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल ९९.९८ टक्के गुणांसह टॉपर ठरली आहेत. एमएचटी-सीईटीच्या https://mhtcet2019.mahaonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून वेबसाईटवर निकाल उपलब्ध आहे.


२०,९३० विद्यार्थी अनुपस्थित

राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तसंच, २०, ९३० विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) या विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.


निकालाची चर्चा

मे आणि १३ मे २०१९ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ३ जून रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर होणार अशी चर्चा होती. परंतु, जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, मंगळवारी निकाल जाहीर झाला आहे.


काऊन्सेलिंग सेशनसाठी पात्र

सर्व पात्र उमेदवारांना त्यांचा स्कोअर, रॅंक आणि क्वलिफिकेशन स्टेटससह स्कोअरकार्ड पाहता येणार आहे. मात्र, निकाल पाहण्यासाठी जन्मतारिख, रोल नंबर ही आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना जवळ बाळगणं आवश्यक आहे. या परिक्षेत पात्र झालेले विद्यार्थ्यी पुढे काऊन्सेलिंग सेशनसाठी पात्र असणार आहेत. त्याशिवाय, मिळालेल्या रॅंकनुसार, विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीच्या फेऱ्यांसाठी ते पात्र ठरतील त्यानंतर त्यांचा प्रवेश निश्चत होईल, असं राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून नमूद करण्यात आलं आहे.


ऑनलाइन पद्धतीनं जाहीर

ऑनलाइन पद्धतीनं जाहीर झालेल्या निकालावर विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या पालकाचं नाव, आईचं नाव यांचा उल्लेख असेल. निकालावर संबंधित विद्यार्थ्याचं छायाचित्रही असणार आहे. त्याचप्रमाणं, संबंधित विद्यार्थ्यानं किती वाजता निकाल डाउनलोड करून घेतला, याबाबतची माहितीही दिली जाणार आहे, असं प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.हेही वाचा -

यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासा देणारा ठरेल - महापौर विश्वनाथ महाडेश्वर

प्रवेश प्रक्रिया नव्यानं राबवण्यात यावी, वैद्यकीय पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांची मागणीRead this story in English
संबंधित विषय