ठाणे पोलिसांनी ठाणे–घोडबंदर राज्य महामार्ग क्रमांक 84 वर Gaimukh निराकेंद्र–काजुपाडा– फाउंटन हॉटेल या दरम्यान वाहतूक बदल जाहीर केला आहे. D.B.M आणि मॅस्टिक रोडवर्कसाठी रात्रीच्या वेळी वाहतूक बदलाची घोषणा केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि ठाणे महापालिका हे काम 12 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12:01 पासून 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत करणार आहे.
बंद राहणारे रस्ते आणि पर्यायी मार्गपर्यायी मार्ग:
a) मुंबई–ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व जड वाहने Y-जंक्शनवरून खारेगाव टोल नाका – मानकोली – अंजनफाटा मार्गे नाशिक रोडला जाऊन इच्छित ठिकाणी पोहोचू शकतात.
b) मुंबई–ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व जड वाहने कापुरबावडी जंक्शनवर उजवीकडे वळून काशेली – अंजनफाटा मार्गे पुढे जाऊ शकतात.
2. मुंब्रा, कल्याणकडून घोडबंदर रोडकडे जाणारी जड वाहने खारेगाव टोल प्लाझा येथे 'बंद' केली जातील.पर्यायी मार्ग:
मुंब्रा–कल्याणकडून घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व जड वाहने खारेगाव खाडी ब्रिज – खारेगाव टोल प्लाझा – मानकोली – अंजनफाटा मार्गे इच्छित ठिकाणी जाऊ शकतात.
पर्यायी मार्ग:
नाशिककडून येणारी सर्व जड वाहने मानकोली ब्रिजखाली उजवीकडे वळून अंजनफाटा मार्गे इच्छित गंतव्यस्थानी जाऊ शकतात.
हलक्या वाहनांसाठी सूचनाअधिकृत निवेदनानुसार, ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणारी हलकी वाहने घोडबंदर–ठाणे रोडवरील गायमुख चौकीपासून ‘विपरीत दिशेने’ (wrong side) जाऊ शकतात. त्यानंतर फाउंटन हॉटेलसमोरून पुढे त्यांच्या इच्छित ठिकाणी जाऊ शकतात.
हेही वाचा