रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे. आज ८२३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचाः- अर्णब गोस्वामीचा तुरूंगातील मुक्काम वाढला

राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचाः- दिवाळीनंतर शाळा होणार सुरू , उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

तर. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे २३ रुग्ण दगावले आहेत. तर ६ आँक्टोंबर रोजी १५ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ८ आँक्टोंबर रोजी एकूण २५ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे ९९८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ६४ हजार ५४३ इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ८६५ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण २ लाख ३६ हजार ५२२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या