समुद्र खवळला, भरती- ओहोटी कधी होणार?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई शहर (mumbai) आणि उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच हवामान खात्याने 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच समुद्राला उधाण (mumbai rains) आल्याने प्रशासनाने भरती (high tide) आणि ओहोटीबाबतही (lower tide)  माहिती दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेनं (bmc) दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9.16 वाजता समुद्राला 3.75 मीटरची भरती आली होती. दुपारी 3.16 वाजता 2.22 मीटरची ओहोटी येण्याचा अंदाज आहे.

रात्री 8.53 वाजता 3.14 मीटरची भरती अपेक्षित आहे, तर उद्या 20 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्रीनंतर 03.11 वाजता 1.05 मीटरची ओहोटी असणार आहे.

महापालिकेकडून आज पहाटे 4 ते 8 वाजेपर्यंतच्या पावसाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज दिवसभरातील भरती-ओहोटीची वेळ खालीलप्रमाणे आहे:

- सकाळी 9.16 वाजता - 3.75 मीटर (भरती)

- दुपारी 3.16 वाजता - 2.22 मीटर (ओहोटी)

- रात्री 8.53 वाजता - 3.14 मीटर (भरती)

- मध्यरात्रीनंतर 03.11 वाजता (उद्या, 20 ऑगस्ट 2025) - 1.05 मीटर (ओहोटी)


हेही वाचा

वसई विरारला जाणाऱ्या लोकल्स बंद

सीएसएमटी ते ठाणे हार्बर आणि सेंट्रल मार्गावरील रेल्वे सेवा बंद

पुढील बातमी
इतर बातम्या