मुसळधार पावसामुळे वसई (vasai road) आणि विरारला (virar) जाणाऱ्या लोकलसेवा बंद करण्यात आल्या आहेत. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच मुंबईहून (mumbai) वसई विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसेवा (mumbai local) पुढील सुचनेपर्यंत बंद करण्यात आले आहेत.
मुंबई लोकल वसईपर्यंतच धावत असून रेल्वे रुळावर पाणी आल्याने पुढील रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली आहे.
Due to heavy rains, local train services between Virar and Vasai are suspended until further notice. In case of emergency, dial 1512. #GRPMumbai #MumbaiRains
— GRP Mumbai (@grpmumbai) August 19, 2025
मुसळधार पावसामुळे सीएसएमटी (csmt) ते ठाणे हार्बर आणि सेंट्रल मार्गावरील रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत, कृपया 1512 वर संपर्क साधा.
हेही वाचा