सिद्धविनायक मंदिर उचलणार शहीद सुनील काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील बांदझू इथं मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरजवान सुनिल दत्तात्रय काळे (वय ४२) यांच्यावर शासकीय इतमामात सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दक्षिण काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील बांदझू येथे दहशतवाद्यांशी लढताना सुनिल काळे यांना वीरमरण आले होते.

सुनिल काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं नुकतीच घोषणा केली आहे की, शहीद सुनिल काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते उचलणार आहेत. २३ जून रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा इथं एका ऑपरेशन दरम्यान त्यांना  वीरमरण आले. १८२ व्या बटालियन सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबल सुनील काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट जबाबदारी घेणार आहे.

दहशतवाद्यांशी आपल्या जीवाची परवा न करणारे सुनील काळे गेल्या १७ वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलिस दालत काम करत होते. नुकतेच त्यांना हेड काँस्टेबल या पदावर बढती मिळाली होती. दोन भाऊ आणि एका बहीणीत ते मधले बंधू होते. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी जानेवारी महिन्यातच गावी येऊन कुटुंबियांची भेट घेतली होती. यानंतर ते पुन्हा ड्युटीवर परतले. याच महिन्यात पुन्हा सुटी घेऊन गावी येण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतु, कोरोना असल्याने ते घरी येऊ शकले नाही.

23 जून रोजी पहाटे जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पुलवामा (Pulwama) इथं दशहतवाद्यांविरोधात लढत असताना पानगांवचे CRPF जवान सुनिल काळे यांना वीरमरण प्राप्त झाले. या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. शहीद सुनिल काळे यांचे पार्थिव विशेष विमानाने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पानगाव या त्यांच्या मुळगावी आणण्यात आले होते.


हेही वाचा

शिवाजी पार्क स्मशानभूमीप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका

MSEDCL Electricity Bill : ४ पट वीजबिलाचा नवी मुंबईकरांना 'शाॅक'

पुढील बातमी
इतर बातम्या