Advertisement

शिवाजी पार्क स्मशानभूमीप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका

दादर बाहेरच्या रुग्णांचे अंत्यविधी त्यांच्या भागातच व्हावेत, ते शिवाजी पार्क स्मशानभूमीत करू नयेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. हा प्रश्न आता उच्च न्यायालयात पोचला आहे.

शिवाजी पार्क स्मशानभूमीप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका
SHARES
मुंबईच्या विविध भागांतील मृत कोरोना रुग्णांचे अंत्यविधी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत केले जातात. या अंत्यविधींना शिवाजी पार्कमधील स्थानिकांनी विरोध केला करून सोमवारी मूक आंदोलन केलं. दादर बाहेरच्या रुग्णांचे अंत्यविधी त्यांच्या भागातच व्हावेत, ते शिवाजी पार्क स्मशानभूमीत करू नयेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.  हा प्रश्न आता उच्च न्यायालयात पोचला आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी अॅड. अपर्णा व्हटकर यांच्यामार्फत याप्रश्नी तातडीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. 



मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर 'व्हीसी'द्वारे याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याविषयीच्या याचिकेत मुंबई महापालिकेला प्रतिवादी करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवली. सर्व कोरोना मृतदेहांच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच विविध धर्मांच्या पद्धतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश द्यावेत आणि स्मशानभूमींमधील कामगारांना त्यांच्या सुरक्षिततेची सर्व साधने देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती तिरोडकर यांनी याचिकेत केली आहे.

 कोरोनाने मरण पावणाऱ्या व्यक्तींच्या मृतदेहांच्या व्यवस्थापनाविषयी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने व आयसीएमआरने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. मात्र, शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना त्याचे पालन होत नसल्याच्या स्थानिकांच्या  तक्रारी आहेत. मृतदेह लीकप्रूफ बॅगेत घालून किंवा हायपोक्लोराइट टाकून आणणे अत्यावश्यक आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही. यामुळे या स्मशानभूमीत काम करणाऱ्या एका कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे.


येथील विद्युतदाहिनीच्या चिमणीतून प्रचंड धूर निघत असल्याने स्थानिक रहिवाशांना त्याचा खूप त्रास होत आहे. स्मशानभूमीत केवळ सात कामगार असून मोठ्या संख्येने मृतदेह येत असल्याने त्यांच्यावर प्रचंड ताण आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठीही पुरेसे उपाय योजलेले दिसत नाहीत, असा दावा तिरोडकर यांनी याचिकेत केला आहे. 





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा