Advertisement

G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी

फुट ऑपरेडेट उपकरणांमुळे पालिकेच्या कार्यालयात कर्मचारी सुरक्षित काम करू शकत आहे.

G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी
SHARES

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेले दोन महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु, आता लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना आता कामावर रुजू होण्याचे आदेश आले आहेत. पण लोकांच्या मनात कोरोनाची भिती इतकी पसरली आहे की, लोकं घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत.

आजा १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर रुजू राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या वेगवेगळे उपाय राबवत आहेत. जेणेकरून कर्मचारी सुरक्षित कामावर येऊ शकतील. बृहमुंबई महानगर पालिकेनं देखील कोरोनाशी लढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवल्या आहेत. पायाने चालवता येऊ शकणारे उपकरण पालिकेनं बसवले आहेत.

वॉर्ड G South मधील पालिकेच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये पायानं आता लिफ्ट हँडल करता येणार आहे. लिफ्टच्या बटनांना, दरवाज्याला आपला स्पर्श होऊन कोरोना होण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेक ठिकाणी टुठपिक वापरले जात होते. पण आता पालिकेच्या इमारतीतच एक नव्या प्रकारची प्रणाली लागू करण्यात आली आहे.

नव्या प्रणालीत फक्त लिफ्टच नाही तर, पाणी भरण्यासाठी कुलरच्या नळाला हात न लावता पायानं बटण दाबून पाणी भरता येणार आहे. कार्यालयात प्रवेश करण्याआधी पायानं बटन दाबून सॅनिटायझर वापरण्याची सोय केली आहे.   याशिवाय बेसिनचा नळ पायानं ऑपरेट करणं, अल्ट्रावायलेट रॉडचा वापर करून कागदपत्र निरजंतुकिकरण करणं, अल्ट्रावायलेट बॉक्समध्ये बॅग टाकून निरजंतुकिकरण करण्यात येते. एका डेस्कवर शिल्ट्स लावण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना एअर टाईट मास्क देण्यात आले आहेत, शौचालयात ऑटोमॅटिक सॅनिटायझेशनची व्यवस्था केली आहे.

पालिकेनं यासंदर्भात ट्विट देखील केलं आहे, ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कोव्हिड संक्रमित व्यक्तींशी थेट संपर्क टाळण्यासाठी, @mybmcWardGS नं पायाने चालवता येऊ शकणारे उपकरण बसवले आहेत. त्यांचा उपयोग लिफ्ट, वॉशबेसिन, टॉयलेट फ्लश इत्यादी वापरताना केला जाऊ शकतो.

पालिकेनं राबवलेली उपाययोजना खाजगी आणि सरकारी कार्यालयात देखील राबवली गेली पाहिजे. जेणे करून कर्मचारी मनात कुठलीही भिती न बाळगता आणि सुरक्षित काम करू शकतील. 



हेही वाचा

कोरोनामुक्त लोकांना आयुष्यभर उद्भवणार 'या' समस्या, अभ्यासातून माहिती उघड

Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा