Advertisement

शिवाजी पार्क स्मशानभूमीत बाहेरील रुग्णांच्या अंत्यविधीस स्थानिकांचा विरोध

दादर बाहेरच्या रुग्णांचे अंत्यविधी त्यांच्या भागातच व्हावेत, ते शिवाजी पार्क स्मशानभूमीत करू नयेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

शिवाजी पार्क स्मशानभूमीत बाहेरील रुग्णांच्या अंत्यविधीस स्थानिकांचा विरोध
SHARES
मुंबईच्या विविध भागांतील मृत कोरोना रुग्णांचे अंत्यविधी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत केले जातात. या अंत्यविधींना आता शिवाजी पार्कमधील स्थानिकांनी विरोध केला आहे.  दादर बाहेरच्या रुग्णांचे अंत्यविधी त्यांच्या भागातच व्हावेत, ते शिवाजी पार्क स्मशानभूमीत करू नयेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. 


स्थानिक रहिवाशांनी सोमवारी मूक आंदोलन केलं. स्वच्छ श्वास हा आमचा अधिकार आहे... मृतदेह बोलू शकत नाहीत, म्हणून आम्ही बोलतोय... एक पाऊल, स्थानिकांच्या निरोगी आयुष्यासाठी... अशा घोषणा असलेले फलक त्यांच्या हातात होते. प्रशासनानं तातडीनं याबाबत उपाययोजना करावी. मृतदेहांचा नव्हे, जिवंत माणसांचा विचार करा, असं स्थानिकांनी यावेळी म्हटलं. 


मुंबईत कोरोना मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. मृत्यू झालेला रुग्ण कुठल्याही भागातील असला तरी त्याचे अंत्यसंस्कार जवळच्या स्मशानभूमीत केले जातात. महापालिकेची बहुतांश मोठी रुग्णालयं मुंबईत आहेत. त्यामुळं अनेक मृतदेह शिवाजी पार्क स्मशानभूमीत आणले जात आहेत.  

दिवसाला २५ ते ३० अंत्यविधी शिवाजी पार्क स्मशानभूमी होत आहेत. त्यामुळे येथील प्रदूषण वाढलं असून त्वचा विकार व श्वसनाचे आजार वाढले असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे दादर बाहेरील मृत्यदेहांवर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यावर आक्षेप घेऊन स्थानिक नागरीक रस्त्यावर उतरले. प्रशासन स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा त्रागाही यावेळी व्यक्त करण्यात आला.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती पुन्हा पुर्वरत

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा