Advertisement

Coronavirus updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती सीलमुक्त

कोरोना व्हायरसच्या फैलावामुळं राज्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आता हळूहळू सुधारत आहे.

Coronavirus updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती सीलमुक्त
SHARES

मुंबईसह देशभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.  संख्या मोठ्या कोरोनाच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, असं असलं तरी कोरोना व्हायरसच्या फैलावामुळं राज्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आता हळूहळू सुधारत आहे. राज्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणार कालावधी आता २६ दिवरसांवर पोहोचला असून, यामुळं मुंबईतील कंटेन्मेंट झोन आणि सील करण्यात आलेल्या इमारती पुन्हा पूर्ववत होत आहेत.

दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यामुळं मुंबईतील १० हजार ३६९ इमारती सील करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर आता त्यापैकी ४७१० म्हणजेच ४५ टक्के इमारती फ्री करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईत अद्याप ५६५९ म्हणजेच ५५ टक्के इमारती सील आहेत.

यांसदर्भातील महापालिकेच्या अहवालानुसार, अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरात सर्वाधिक ५१६ इमारती रिलीज करण्यात आल्या आहेत. सध्या केवळ २३० इमारतीच सील आहेत. इमारती सील करण्यात बोरीवलीचा दुसरा क्रमांक होता. इथं, तब्बल ९३५ इमारती सील करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४७६ इमारती रिलीज झाल्या आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबईत १२९३ कंटेन्मेट झोन बनविण्यात आले होते. त्यापैकी, सध्या ८७१ झोन कार्यरत असून ४२२ रिलीज करण्यात आले आहेत. एल वॉर्डअंतर्गत कुर्ला, साकीनाका परिसरात सर्वाधिक ३२८ कंटेनमेंट झोन होते. त्यापैकी २१६ झोन रिलीज केले आहेत. तर, मलबार हिल, महालक्ष्मी आणि रेसकोर्स इथं सर्वात कमी ५८ कंटेन्मेट झोन कार्यरत होते.

राज्यात रविवारी कोरोनाचे ३८७० नवीन रुग्ण पॉझिटीव्ह सापडले असून, एकूण रुग्णसंख्या १,३२,०७५ पर्यंत पोहोचली आहे. तर, राज्यात सद्यस्थितीत कोरोनाच्या ६० हजार १४७  रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ६५ हजार ७४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 



हेही वाचा -

कोरोनावर आली गोळी, मुंबईत उत्पादन सुरू

मार्वे चौपाटीवर दोन मुले बुडाली, शोधकार्य सुरू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा