Advertisement

कोरोनावर आली गोळी, मुंबईत उत्पादन सुरू

मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सला कोरोनावरील उपचाराची गोळी तयार करण्याची परवानगी भारतीय औषध महानियंत्रक या संस्थेकडून मिळाली आहे.

कोरोनावर आली गोळी, मुंबईत उत्पादन सुरू
SHARES

जगभरात कोरोनाने लाखो लोकांची बळी गेला आहे. मागील अनेक महिन्यांपासून जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या औषध कंपनीने कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा केला आहे. 

ग्लेनमार्कला कोरोनावरील उपचाराची गोळी तयार करण्याची परवानगी भारतीय औषध महानियंत्रक या संस्थेकडून मिळाली आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) ही गोळी बाजारात आणणार आहे.  कोरोना संसर्गाची सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर हे औषध प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी निवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. 


कोरोना संसर्गावरील उपचारासाठी फॅबीफ्लू हे गोळ्यांच्या रूपात सेवन करता येणारे पहिले फॅविपिराविर औषध आहे, असं ग्लेनमार्कने म्हटलं आहे. चाचणीमध्ये फॅबिफ्लूचा डोस दिल्यानंतर रुग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले. या एका गोळीची किंमत १०३ रुपये असणार आहे. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं अशी माहिती आणि सूचना ग्लेनमार्कचे अध्यक्ष ग्लेन सल्डाना यांनी सांगितलं आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी १८०० मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यांनतर १४ दिवसांपर्यंत ८०० मिलिग्रॅमचे दोन डोस दररोज घ्यायचे आहेत.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement