Advertisement

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण

कोरोना मृतांचा वाढती संख्या लक्षात घेता यामध्ये ५० वर्षांवरील रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून आता मृतांच्या आकडाही वाढतो आहे. कोरोना मृतांचा वाढती संख्या लक्षात घेता यामध्ये ५० वर्षांवरील रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. १९ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार मृतांपैकी ७७ टक्के रुग्ण हे ५० वर्षांवरील होते. १९ जूनपर्यंत ३ हजार ४२३ करोनामृत्यूंची नोंद झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चपासूनच्या विविध मृत्यू प्रकरणांची पडताळणी करून त्यांची संख्या मृतांच्या आकडेवारीत समाविष्ट करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विविध रुग्णालयांतून मार्चपासून झालेल्या ८६२ मृत्यंची संख्या एकूण मृतांच्या आकड्यात समाविष्ट करण्यात आली आहे. तसंच मृतांची आकडेवारी एखाद्या रुग्णालयाकडे प्रलंबित असल्यास त्याची माहिती ताबडतोब देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्यानं मागील काही दिवसांत मृत्यूंची संख्या झपाट्यानं वाढली आहे.

महापालिकेचे आतापर्यंत सुमारे २ हजार कर्मचारी बाधित झाले असून ७० जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेनं मात्र ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांनाच सूट दिली आहे. मात्र मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांचाच समावेश आहे. 

मृतांची संख्या

वय
मृत्यू
३० ते ४० वर्षे
१६२
४० ते ५० वर्षे
४५३
५० ते ६० वर्षे
९६३
६० ते ७० वर्षे
९६४
७० ते ८० वर्षे
५१२



हेही वाचा -

कोरोनावर आली गोळी, मुंबईत उत्पादन सुरू

मार्वे चौपाटीवर दोन मुले बुडाली, शोधकार्य सुरू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा