Advertisement

Bhagwati Hospital ICU: बोरीवलीच्या भगवती रुग्णालयातील आयसीयू अखेर २ वर्षांनी सुरू

भगवती रुग्णालयात २ वर्षांपासून सर्व साहित्य आणि यंत्र खरेदी करूनही येथील आयसीयू विभाग सुरू झाला नव्हता. हा महापालिकेचा निष्काळजीपणा आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

Bhagwati Hospital ICU: बोरीवलीच्या भगवती रुग्णालयातील आयसीयू अखेर २ वर्षांनी सुरू
SHARES

बोरीवलीतील मुंबई महापालिकेच्या भगवती रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (Intensive Care Unit) सोमवार २२ जून २०२० पासून सुरू करण्यात आलं आहे. मागील २ वर्षांपासून हा विभाग बंद होता. पश्चिम उपनगरातील रहिवाशांच्या दृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब ठरणार आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील आयसीयू विभाग तातडीने सुरु करण्याची मागणी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे केली होती. त्यानंतर सोमवारपासून रुग्णालयाचा आयसीयू विभाग सुरू करण्याचं आश्वासन आयुक्त चहल यांनी दिलं होतं.

दरेकर यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यानी रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, उपलब्ध खाटा, उपलब्ध औषधे व इंजेक्शन आदी आरोग्य यंत्रणांची माहिती घेऊन येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.  

हेही वाचा - कांदिवली, बोरीवली, दहिसरमधील रहिवाशांना करावंच लागेल 'या' नियमांचं पालन

सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमधील अपुऱ्या व्यवस्थेमुळे मुंबईत खास करून उपनगरांमधील खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू आहे. सरकारी आणि महापालिका रुग्णालये अद्यावत यंत्रसामुग्रीसह सज्ज ठेवल्यास रुग्णांना खासगी रुग्णालयांत जाण्याची गरज लागणार नाही. भगवती रुग्णालयात २ वर्षांपासून सर्व साहित्य आणि यंत्र खरेदी करूनही येथील आयसीयू विभाग सुरू झाला नव्हता. हा महापालिकेचा निष्काळजीपणा आहे. स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी ६ जून २०२० रोजी संबंधित विषयावर लक्ष वेधण्यासाठी पत्र दिलं होतं. त्यालाही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाकडून आमदारांच्या पत्राचीही दखल घेण्यात येत नसेल, तर हे दुर्दैवी आहे, असं प्रवीण दरेकर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.   

भगवती रुग्णालयात टॉसीझिलीझॅप हे इंजेक्शन आणि रेमेडीसीवर्ड या टॅबलेटचा तुटवडा आहे. उपनगरात १ हजार इंजेक्शनची आवश्यकता असताना सद्यस्थितीत केवळ ४५ इंजेक्शन उपलब्ध आहेत. या इंजेक्शनची किंमत सुमारे ४० हजार रुपये असून या इंजेक्शनचा काळाबाजार होतोय का याची चौकशी होणं आवश्यक आहे, असंही दरेकर म्हणाले.

भगवती रुग्णालयात ६९ खाटा असून त्यात आयसीयूच्या आणखी १० खाटा वाढवण्यात येत आहेत. शिवाय रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर्स देखील उपलब्ध होतील.  

हेही वाचा - भायखळ्यात १ हजार खाटांच्या उपचार केंद्राची निर्मिती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा