Advertisement

भायखळ्यातील १ हजार खाटांचं उपचार केंद्र जूनअखेरीस सेवेत

भायखळा पूर्व परिसरात १ हजार खाटांची क्षमता असलेल्या कोरोना उपचार केंद्राच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे.

भायखळ्यातील १ हजार खाटांचं उपचार केंद्र जूनअखेरीस सेवेत
SHARES

भायखळा पूर्व परिसरात १ हजार खाटांची क्षमता असलेल्या कोरोना उपचार केंद्राच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे.  केंद्र शासनाच्या अखत्यारीतील 'रीचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात हे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. जून महिन्याच्या अखेरीस हे उपचार केंद्र रुग्ण सेवेत दाखल होईल.

उपचार केंद्रातील १ हजार खाटांपैकी ३०० खाटा या ऑक्सीजन बेड असणार आहेत. या ठिकाणी ५० डॉक्टर्स, १०० नर्सेस आणि १५० परिचर व इतर वैद्यकीय कर्मचारी असे एकूण ३००  कर्मचारी कार्यरत असतील. याशिवाय आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका व रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबी देखील गरजेनुरूप उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत.

 हे उपचार केंद्र उभारण्यास १०  जूनला सुरुवात झाली.  महापालिकेचे अनेक अभियंते, कामगार, कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस उभारणीचं काम करत आहेत. केवळ १५ ते २० दिवसात या उपचार केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात असून या महिना अखेरीस हे 'जम्बो फॅसिलिटी' उपचार केंद्र कार्यान्वित होईल.

 या उपचार केंद्राच्या उभारणीच्या अनुषंगाने वैद्यकीय विषयक बाबींचे नियोजन करण्याची जबाबदारी 'परिमंडळ १ 'चे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद आष्टेकर आणि 'इ' विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर निपा मेहता यांनी सांभाळली आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती पुन्हा पुर्वरत

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्णRead this story in English
संबंधित विषय